Gold Rate : सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे. देशात सर्वात स्वस्त सोनं कुठं मिळते? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? नसेल तर आज आपण यासंदर्भात माहिती पाहणार आहोत. देशाची राजधानी दिल्ली (Delhi) किंवा आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) सर्वात स्वस्त सोने उपलब्ध आहे, असे तुम्हालाही वाटत असेल. पण तिथे सोनं स्वस्त नाही. जाणून घेऊयात स्वस्त सोनं कुठे मिळतं? याबाबतची माहिती. 


देशातील 'या' शहरात मिळते सर्वात स्वस्त सोने


भारतातील सर्वात स्वस्त सोने कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये मिळते. बुधवारच्या दरावर नजर टाकली तर चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेटचा दर 70,040 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,400 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,820 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.


दिल्ली आणि मुंबईत सोन्याचा भाव किती?


देशाची राजधानी दिल्लीत आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोन्याला किती दर आहे याबाबतची तुम्हाला माहिती आहे का?  देशातील सर्वात स्वस्त सोने या दोन्ही शहरात मिळत नाही. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 450 रुपयांपर्यंत खाली आला. 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्धतेचे सोने 73600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. त्याच वेळी, 22 कॅरेट म्हणजेच 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईतही सोन्याचा दर देशातील सर्वात कमी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत 24 कॅरेट सोन्याची बंद किंमत 71295 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,010 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.


बंगळुरूमध्ये 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोन्याची किंमत 68,050 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. इतर शहरांच्या किमतींवरही नजर टाकली तर इंदूरमध्ये सोन्याचा भाव 73,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.


ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात वाढ, सप्टेंबरमध्ये दर वाढण्याची शक्यता


मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 31 जुलै रोजी सोन्याचा भाव 70 हजार रुपयांच्या खाली होता आणि 69,655 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जो ऑगस्टच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी वाढून 71,611 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीत 2.80 टक्के म्हणजेच 1,956 रुपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात देखील सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या:


सोन्यानं ग्राहकांना दिला जोर का झटका, ऑगस्टमध्ये दरात मोठी वाढ, सप्टेंबरमध्ये का स्थिती राहणार?