दोन हजारांच्या नोटांवर 'कमळ' आणि 'हत्ती' कशासाठी?: डिंपल यादव
एबीपी माझा वेब टीम | 27 Feb 2017 08:26 AM (IST)
जौनपूर (उत्तरप्रदेश): 'नव्याने चलनात आलेल्या 2 हजारांच्या नोटेवर कमळाचे फूल आणि हत्तीचे चिन्हं का छापले?' असा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी विचारला आहे. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये आयोजित प्रचारसभेमध्ये डिंपल यादव बोलत होत्या. उत्तर प्रदेशातल्या रस्त्यांवर असलेल्या अॅम्ब्युलन्सवर समाजवादी असं लिहिलं आहे. त्यामुळे ते नाव काढून टाकण्याची मागणी मायावतींनी केली होती. त्यावर उत्तर देताना डिंपल यांनी हा प्रतिप्रश्न केला. दरम्यान, यावेळी बोलताना डिंपल यादव यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. 'महिलांशी निगडीत गुन्हेगारीमध्ये उत्तर प्रदेश 28व्या क्रमांकावर तर भाजपशासित असणारे प्रदेश हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.' असं म्हणत डिंपल यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. आज उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान घेतलं जात आहे. एकूण 11 जिल्ह्यातल्या 51 जागांसाठी मतदान सुरु आहे. संबंधित बातम्या: डिंपल यादव यांचं महाराष्ट्र कनेक्शन!