Voter ID Card Download : निवडणूक आयोगानं गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकींच्या तारखांची (Gujarat Elections 2022) घोषणा केली आहे. एक डिसेंबर आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्यात गुजरात निवडणुकीसाठी (Gujarat Elections 2022)  मतदान होणार आहे. गुजरातच्या हिमाचलप्रदेशच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह इतर महागरपालिकेच्या निवडणुकाही लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिक मतदान कार्ड (Voter ID Card) तपासून पाहत आहेत. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने (ECI) नागरिकांसाठी ऑनलाइन मतदान कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. 


डिजिटल मतदान कार्ड (Digital Voter ID Card) सामान्य मतदान कार्डप्रमाणेच ग्राह्य धरलं जाते. स्मार्टफोनमध्ये ई-वोटर कार्ड (E-Voter ID Card) तुम्हाला डाउनलोड करायचं असल्यास सोप्या टेप्स तुम्हाला सांगणार आहोत. डिजिटल मतदान कार्डला (Digital Voter ID Card) तुम्ही मतदानाशिवाय आयडी प्रूफ म्हणूनही वापरु शकता. जाणून घ्या याची प्रक्रिया नेमकी कशी आहे. (Digital Voter ID Card)


ई-वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स - 
निवडणूक आयोगाच्या https://www.nvsp.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा..
E-EPIC कार्ड या पर्यायावर क्लिक करा..
तुम्ही नवीन यूजर असाल तर सर्वात आधी लॉगिन करुन नोंदणी करावी लागेल. 
E-EPIC डाउनलोड पर्याय निवडा
EPIC नंबर अथवा रेफरन्स नंबर टाका.
नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका.. 
त्यानंतर E-EPIC डाउनलोड काहा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा..
तुमच्या स्मार्टफोनमध्ये  Digital Voter ID Card डाउनलोड होईल. 


नोंदणीकृत मोबाइल क्रमांक नसताना ई-वोटर कार्ड कसं डाउनलोड कराल?-
1. तुमचा मोबाइल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर सर्वात आधी तुम्हाला  ई-केवाईसी करावे लागेल.
2. त्यानंतर तुम्हाला फेस लाइवनेस वेरिफिकेशन पास करावं लागेल. 
3. मोबाइल क्रमांक अपडेट करा. 
4. त्यानंतर तुम्हाला वरील पर्याय फॉलो करत E-EPIC डाउनलोड करु शकता.  


वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्याची आणखी एक पद्धत -
http://voterportal.eci.gov.in/ अथवा  http://electoralsearch.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत तुमचं नाव शोधा... त्यानंतर  EPIC नंबर पाहा.......  नोंदणीकृत मोबाइल नंबरच्या मदतीनं ई-वोटर आयडी कार्ड डाउनलोड करा.. (Digital Voter ID Card)


हे ही वाचायला विसरु नका : 


Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत अभ्यास मंडळात सुटा, तर 'पदव्युत्तर'मध्ये सुप्टाची सरशी