Indian Railway : आपल्या देशात अजूनही सर्वात स्वस्त आणि चांगला पर्याय म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. देशात जास्तीत लोक प्रवास करण्यासाठी रेल्वेवर अवलंबून आहेत. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून भारतीय रेल्वेकडे (Indian Railway) पाहिलं जातं. यामुळे लोकांच्या मनात नेहमी एक प्रकारचं कुतूहल निर्माण होतं. पण रेल्वेच्या काही गोष्टींबद्दल लोकांना काहीच माहिती नसतं. यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारचं कन्फ्यूजन तयार होतं. असंच एक कन्फ्यूजन आहे, ते रेल्वे लाईन आणि ट्रॅकशी संबंधित आहे. पण सर्वसामान्य लोक रेल्वे लाईन आणि रेल्वे ट्रॅक एक गोष्ट आहे. पण हे साफ खोट आहे. कारण रेल्वे लाईन आणि रेल्वे ट्रॅक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु यांच्यामध्ये एक अंतर आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया... 


रेल्वे लाईन आणि ट्रॅकमधील हा आहे फरक 


खरं पाहिलं तर रेल्वे लाईन हा रेल्वे ट्रॅकचा आधारस्तंभ आहे. समजा, मुंबईपासून ते नांदेडपर्यंतच्या दरम्यान एक नवीन रेल्वे लाईन तयार करण्यात येईल आणि या लाईनवर ट्रॅक टाकण्याचं काम 3 महिन्यानंतर सुरू होईल. आता तुम्हाला समजलं असेल की वरीलप्रमाणे सांगितल्यानुसार, दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. यावरून या दोघांतील फरक समजून येतो. ज्याप्रमाणे गणितात कोणत्याही लाईनचा अर्थ दोन बिंदूमधील अंतरावरून ठरतं. यासारखंच रेल्वे लाईन एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचं अंतर आहे. याचा अर्थ, मुंबईपासून ते नांदेड दरम्यान एक नवीन रेल्वे लाईन तयार येईल आणि या लाईनवर नवीन ट्रॅक टाकण्यात येईल. या रेल्वे ट्रॅकचा इतकाच अर्थ आहे की, रेल्वे लाईनवर टाकलेली पटरी, गिट्टी आणि लाकडी स्लीपर्स यापासून रेल्वे ट्रॅक तयार केला जातो. 


रेल्वेत किती प्रकारच्या लाईन्स असतात?


रेल्वेमध्ये एकूण 4 प्रकारच्या लाईन्स असतात. ज्यामध्ये मुख्य लाईनशिवाय, ब्रँच लाईन, ट्रंक लाईन आणि एक लूप लाईन असते. खरंतर लूप लाईनचं काम फक्त रेल्वे स्टेशनच्या जवळपासचं असतं. या लाईन्सच्या (मार्ग) आधारेच सर्व ट्रेन्सची वेगमर्यादा ठरवली जाते. 


रेल्वे लाईनच्या पटरीवर गंज का लागत नाही?


रेल्वे धावण्यासाठी जी पटरी किंवा रुळ टाकला जातो तो कोणत्याही वातावरणात खराब होत नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं गंज चढत नाही. पण लोखंडाची एखादी पाईप किंवा वस्तू काही दिवसासाठी मोकळ्या वातारणात राहिली तर त्यावर गंज चढण्यास सुरूवात होते. खरंतर रेल्वेची पटरी लोखंडापासून नव्हे, तर एका खास स्टीलपासून बनवलेली असते. यामुळे बाहेरील वातावरणाचा अर्थात, उन्ह, पाऊस आणि वारा याचा कोणताही परिणाम होत नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Indian Railway : आता रेल्वेत विना तिकीट प्रवास करण्यापासून TTE तुम्हाला रोखणार नाही, जाणून घ्या नवा नियम