नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमध्ये माघ पौर्णिमेचे स्नान सुरू आहे. माघ पौर्णिमा स्नानासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजला पोहोचले आहेत. मात्र याच दरम्यान राज्य सरकारने जारी केलेल्या एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. वास्तविक, महाकुंभ संदर्भात यूपी सरकारच्या जाहिरातीत 'हिंदुस्थान' हा शब्द वापरण्यात आला. त्यामुळे हिंदुस्तान आणि हिंदुस्थान हे दोन्ही शब्द चर्चेत आले आहेत. 


काय प्रकरण आहे?


उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज येथील महाकुंभाशी संबंधित जाहिरात जारी केली आहे. ज्यावर हिंदुस्थान हा शब्द वापरण्यात आला आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आणि काँग्रेस नेत्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.


Hindustan : 'हिंदुस्तान' म्हणजे काय? 


भारताला हिंदुस्तान म्हणतात, पण या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुर्क आणि इराणी लोक भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातून प्रवेश केला. पण तिथले लोक 'स' अक्षराचा उच्चार 'ह' असा करायचे. म्हणून ते सिंधूला हिंदू म्हणू लागले आणि या प्रदेशाला हिंदुस्तान म्हणू लागले. याशिवाय हिंदू आणि हिंद हे दोन्ही शब्द इंडो-आर्यन किंवा संस्कृत शब्द सिंधू म्हणजेच सिंधू नदी किंवा तिच्या प्रदेशातून आले आहेत असं म्हटले जाते. 


Meaning Of Hindu : हिंदू हा शब्द वापरात कसा आला?


भारताचे प्राचीन नाव जर आर्यवर्त होते तर हिंदू हा शब्द कसा प्रचलित झाला असा प्रश्न अनेकांना पडतो. तर हिंदू हे धर्माचे प्रतीक नव्हते तर प्रदेशाचे प्रतीक होते. अरबी भाषेत  अल-हिंद ही संकल्पना भारतासाठी लिहिली आहे. इतिहासकारांच्या मते, हिंदू हे कोणत्याही धर्माचे नाव नाही. पर्शियन लोकांनी या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या राष्ट्रीयतेचे वर्णन करण्यासाठी हिंदू हा शब्द वापरला. हिंद आणि हिंदू ही दोन्ही नावे 11 व्या शतकापासून पर्शियन आणि अरबी भाषेत प्रचलित होती. मुघल काळातील राज्यकर्ते दिल्लीच्या आसपासच्या भागाला हिंदुस्तान म्हणत.


'हिंदुस्थान' म्हणजे काय?


आता प्रश्न असा आहे की, उत्तर प्रदेश सरकारने हिंदुस्थान या शब्दाचा वापर का केला आणि त्याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान. म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू धर्माचे, संस्कृतीचे पालन करणारे लोक राहतात त्या ठिकाणाला हिंदुस्थान म्हटलं जातं. भारताला जर हिंदुस्थान म्हटलं तर त्याचा अर्थ हिंदू लोकांचे ठिकाण असा होतो. त्यामुळेच उत्तर प्रदेश सरकारने हिंदुस्तान शब्दाच्या ऐवजी हिंदुस्थान या शब्दाचा वापर केला आहे. 


ही बातमी वाचा: