नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याच्याविरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिच्याबद्दल केलेल्या सोशल मिडिया पोस्टबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ध्रुव राठी यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ध्रुव राठीनं संबंधित माध्यम संस्थेला जाब देखील विचारला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा ध्रुव राठी पॅरडी अकाऊंटवर केलेला आहे. या सोशल मीडिया अकाऊंटशी ध्रुव राठी याचा काहीरी संबंध नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिनं परीक्षा न देता यूपीएससीमध्ये यश मिळवलं, अशा आशयाच्या पोस्ट ध्रुव राठी पॅरडी अकाऊंटवरुन करण्यात आल्या होत्या. या खात्यासंदर्भात एकूण 9 पोस्टच्या लिंकचा आधार घेत ध्रुव राठी पॅरडी या अकाऊंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार बदनामी, जाणीवपूर्वक अपमान, शांततेचा भंग करणे, चुकीची माहिती देणारी वक्तव्य करणे यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्रुव राठी काय म्हणाला?
ध्रुव राठीनं ज्या ट्विटर अकाऊंटवर गुन्हा दाखल झालाय ते पॅरडी अकाऊंट आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. संबंधित माध्यमानं सखोल तपास करण्याची गरज असल्याचं देखील ध्रुव राठी म्हणाला.
ध्रुव राठीचं खरं एक्स खातं:
नेमक्या कोणत्या खात्यावर गुन्हा दाखल ?
यूट्यूबर ध्रुव राठी याचं अधिकृत ट्विटर खातं dhruv_rathee या यूजरनेम द्वारे चालवलं जातं. महाराष्ट्र नोडल सायबर पोलीस विभागाकडून ज्या खात्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलं ते खात ध्रुव राठी पॅरडी असं आहे. त्याचा यूजरनेम हा dhruvrahtee असं आहे. ध्रुव राठीचं ओरिजनल ट्विटर अकाऊंट आणि ध्रुव राठी पॅरडी या अकाऊंटमध्ये फरक आहे. पोलिसांकडून dhruvrahtee या खात्यावरुन पोस्ट करण्यात आलेल्या लिंक्सचा दाखला देत गुन्हा दाखल केला आहे.
ज्या खात्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ते खातं :
ध्रुव राठी पॅरडी हे अकाऊंट जो व्यक्ती चालवतो त्यानं महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर ओम बिर्ला यांच्या संदर्भातील पोस्ट डिलिट केल्या आहेत. या सर्व प्रकरणातील तथ्य माहिती नसल्यानं इतर ठिकाणाहून मजकूर कॉपी करुन तो पोस्ट केला होता. या सर्व प्रकरणात माफी मागत असल्याचं ध्रुव राठी पॅरडी अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं आहे.
इतर बातम्या: