मुंबई : टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नोटाबंदी हा एक धाडसी निर्णय आहे. यामुळे काळा पैसा बाहेर येण्यासाठी मदत होईल, असं रतन टाटा म्हणाले.
नोटाबंदीच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. तर काहींनी निर्णयाला विरोधही केला. मात्र रतन टाटा यांनी या निर्णयाचं स्वागत करत धाडसी पाऊल उचलल्याबद्दल मोदींचं अभिनंदन केलं आहे. शिवाय हा निर्णय यशस्वी होण्यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
https://twitter.com/RNTata2000/status/801081057261010944
पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी काळा पैसा, बनावट नोटा बाहेर काढण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत.