नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी बँक आणि एटीएम व्यवस्था यासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. याच बैठकीत देशभरातील एटीएम व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करण्यासंदर्भात चर्चाही केली जाणार आहे.


500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने देशभरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी बँक आणि एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत. अनेक लोकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. त्यामुळे विरोधकांकडूनही मोदी सरकावर टीका केली जात आहे.

लोकांना रोजच्या व्यवहारात अडथळे येऊ नयेत, यासाठी एटीएम व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. शिवाय, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी आणखी काही पर्याय आहेत का, यावरही विचारमंथन केलं जाणार आहे.

नोटाबंदीचा पंतप्रधान मोदींचा निर्णय

 

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.

देशभरात गोंधळाचं वातावरण

काळ्या पैशाविरोधातील लढाई आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, देशभरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झाले आहे.