दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या बायकोचा खून, 'त्या' हत्या प्रकरणी ट्विस्ट
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2017 01:21 PM (IST)
आरोपी पंकज मेहराने लपूनछपून दुसरं लग्न केलं असून तिच्यासोबत राहण्यासाठी त्याने प्रियाचा काटा काढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : दोन वर्षांचा मुलगा आणि पतीसमोर गोळ्या झाडून विवाहितेची हत्या झाल्याच्या दिल्लीतील प्रकरणाला ट्विस्ट मिळाला आहे. तरुणीच्या पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपी पंकज मेहराने लपूनछपून दुसरं लग्न केलं असून तिच्यासोबत राहण्यासाठी त्याने प्रियाचा काटा काढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एका फायनान्सरकडून आपण 40 लाख रुपये घेतले होते. ते परत न केल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या कर्जातूनच आपल्यावर गोळीबार झाल्याचा बनाव आरोपी पंकज मेहराने सुरुवातीला केला होता.