नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून दिल्लीमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील GTB हॉस्पिटलमध्ये एक आणिबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला. पण सरकारच्या प्रयत्नाने या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टॅन्कर पोहोचला आणि या सर्व रुग्णाचा जीव वाचला. ही माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. 


GTB हॉस्पिटलमध्ये हे 500 रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी आशा सोडली होती अशी भावना एका डॉक्टरांनी व्यक्त केली. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे याची कल्पना रुग्णांना देण्यात आली नव्हती. ही गोष्ट केवळ डॉक्टरांनाच माहित होती. अशावेळी सर्व डॉक्टर केवळ चमत्काराच्या आशेवर होते. त्याचवेळी ऑक्सिजनचा टॅन्कर हॉस्पिटलच्या दारात आला आणि सर्व डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास टाकला. या ऑक्सिजनच्या पुरवठ्याला जरा जरी वेळ झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता असं मत या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केलं.


 






दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना टॅग करत एक ट्वीट केलं आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारला तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत आवाहन केलं होतं. 


 




महत्वाच्या बातम्या :