नवी दिल्ली: देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठा मूक मोर्चाला आता नोटबंदीचा फटका बसला आहे. कारण राजधानी दिल्लीतील 20 नोव्हेंबरचा मराठा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.


याबाबतचा निर्णय नुकताच आयोजकांनी घेतला आहे. मात्र दिल्लीतील मोर्चाची पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

राज्यातील बहुतेक जिल्ह्यात मराठा मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं. गेल्या दोन महिन्यांपासून विराट संख्येने हे मोर्चे निघत आहेत. नुकतंच मुंबईत मराठा मोर्चाची बाईक रॅली झाली. यावेळीही मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

त्यानंतर राजधानी दिल्लीतही मराठा मोर्चा 20 नोव्हेंबरला धडक देणार होता, मात्र आता नोटाबंदीमुळे या मोर्चाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना तात्काळ फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.