नवी दिल्ली : दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी आज आपल्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. माजी सनदी अधिकारी असलेले अनिल बैजल यांनी 31 डिसेंबर 2016 रोजी दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाची सूत्रं हातात घेतली होती. आता त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवला आहे. 


अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता त्या ठिकाणी नव्या नायब राज्यपालांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अनिल बैजल यांनी 31 डिसेंबर 2021 रोजी आपल्या कार्यकालाची पाच वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या या कार्यकालाच्या दरम्यान त्यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी अनेकदा मतभेद आणि संघर्ष झाले होते. 


 






 


अनिल बैजल हे 1969 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं. केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना त्यांची केंद्रीय गृह सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्यांची शहरी विकास मंत्रालयामध्ये बदली करण्यात आली. त्यावेळी जवाहरलाल नेहरु नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन या योजनेच्या अंमलबजावणीचे काम अनिल बैजय यांनी चोखपणे पार पाडलं. 


अनिल बैजल यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इंडियन एअरलाईन्सचे चेअरमन, प्रसार भारतीचे सीईओ, गोव्यामध्ये डेव्हलपमेन्ट कमिशनर तसेच नेपाळला भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या मदत कार्यामध्ये काऊंसेलर इनचार्ज म्हणून काम पाहिलं. 


महत्त्वाच्या बातम्या: