Delhi Excise Policy Case : आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याबाबत (Delhi Excise Policy Case) मोठा दावा केला आहे. शनिवारी (23 मार्च) आप मंत्री आणि पक्षाचे नेते आतिशी यांनी या प्रकरणाचा मनी ट्रेल समोर आल्याचे म्हटले आहे. हा सर्व पैसा भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खात्यात गेला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राईट हँड ईडीला या प्रकरणात भाजपला आरोपी बनवून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना अटक करण्याचे आव्हान देत असल्याचे म्हटले आहे. ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना पीएमएल कोर्टाकडून 28 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. 






पण पैसा कुठे आहे? आतिशींकडून विचारणा 


तथाकथित घोटाळ्याखाली अटक करण्यात आल्याचेही आतिशी यांनी सांगितले. केवळ एका व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. शरदचंद्र रेड्डी असे या व्यक्तीचे नाव असून ते औषध निर्मिती कंपनी अरबिंदो फार्माचे मालक आहेत. दिल्लीच्या अबकारी धोरणात शरदचंद्र रेड्डी यांनाही काही दुकाने मिळाली. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी केजरीवाल यांना कधीही भेटलो नाही किंवा आमचा आपशी काही संबंध नाही. असे सांगताच त्यांना दुसऱ्याच दिवशी ईडीने अटक केली. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर, एके दिवशी रेड्डी यांनी आपले विधान बदलले आणि सांगितले की आपण केजरीवालांना भेटलो होतो आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशीही दारू घोटाळ्यावर बोललो होतो पण हे फक्त विधान आहे पण पैसा कुठे आहे?






AAP च्या पत्रकार परिषदेदरम्यान, आतिशी यांनी दावा केला की शरथ रेड्डी यांच्या कंपन्यांनी निवडणूक बाँडद्वारे भाजपच्या खात्यात पैसे दिले आहेत. आधी साडेचार कोटी आणि नंतर अटकेनंतर 55 कोटी रुपये भाजपला देण्यात आले. मी पंतप्रधान मोदी आणि ईडीला आव्हान देतो की आता दारू घोटाळ्यात मनी ट्रेल आहे. ईडीने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना अटक करावी. 






इतर महत्वाच्या बातम्या