Vijay Darda Convicted : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी (Coal Block Scam) राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सर्वाना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने (Special Court Delhi) आज हा निकाल दिला आहे. या सगळ्यांना 18 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.


राऊज एवेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि पुत्र देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी,जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायालयाने त्यांना आयपीसीच्या कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.






छत्तीसगड कोळसा घोटाळ्यातील अनेक आरोपी तुरुंगात


छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण  रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.


अनेकांना अटक होण्याची शक्यता


तर या प्रकरणात अनेकांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरु आहे, ज्यात माजी जिल्हाधिकारी आयएएस रानू साहू यांचाही समावेश आहे. याचे धागेदोरे संबंधित कोळसा खाण वाटप घोटाळ्याशी संबंधित आहेत, ज्यात आज दिल्लीतील कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे. भविष्यात ईडीकडून छत्तीसगडमधील कोळसा घोटाळ्याशी संबंधित अनेक लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.


VIDEO : विजय दर्डा यांना Coal Scam प्रकरणी दोषी, मुलगा देवेंद्र दर्डा देखील दोषी