Delhi Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसरात एका कारमध्ये स्फोट (New Delhi Bomb Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्याकाळी 6 वाजून 52 मिनीटांच्या आसपास ही घटना घडली आहे. यामध्ये आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जर तुमच्या ओळखीच्या या भागात गेलेल्या एखाद्या व्यक्तीशी संपर्क होत नसले तर काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिल्ली प्रशासने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.या नंबरवर तुम्ही फोन करुन माहिती मिळवू शकता.
हे हेल्पलाइन नंबर मदत करतील:
दिल्ली पोलिस आपत्कालीन क्रमांक: 122 (24 तास, बेपत्ता व्यक्तीची माहिती तपासली जाईल)दिल्ली पोलिस नियंत्रण कक्ष: 011-22910010 किंवा 011-22910011एलएनजेपी रुग्णालय (जिथे बहुतेक जखमी आहेत): 011-23233400, आपत्कालीन क्रमांक: 011-23239449 (तुम्ही रुग्णालयात जाऊन किंवा फोनद्वारे चौकशी करू शकता)
दिल्ली अग्निशमन सेवा: 101रुग्णवाहिका: 102 किंवा 108 एम्स ट्रॉमा सेंटर (जर कोणी तिथे हलवले असेल तर): 011-26594405महिला हेल्पलाइन (जर बहीण किंवा मुलगी बेपत्ता असेल तर): 1091 किंवा 181 विशेष डेस्क देखील मदत करतील
लाल किल्ला पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तींसाठी एक विशेष डेस्क
दिल्ली पोलिसांचे दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तींसाठी एक विशेष डेस्क स्थापन करण्यात आला आहे. तुम्हाला बेपत्ता व्यक्तीचा फोटो सादर करून येथे तक्रार दाखल करावी लागेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही. पोलिस प्रशासन सर्व प्रकारे मदत करण्यासाठी आहे. घाबरून न जाता तुम्हाला जे काही करायचे आहे ते त्यांना सांगावे लागेल, त्यानंतर तुम्हाला मदत मिळेल.
दिल्ली स्फोटात आतापर्यंत काय घडले आहे?
आज 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनीटांनी दिल्लीतील लाल किल्ला परिसर पुन्हा एकदा हादरला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मारुती इको व्हॅनचा अचानक जोरदार स्फोट झाला. जवळील अनेक वाहने आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली आणि आगीच्या ज्वाळा उसळू लागल्या. आतापर्यंत या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: