नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. त्या कारमधील स्फोटानंतर इतर वाहनांना आग लागली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीतील या घटनेत 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा हून अधिक गाड्यांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलांना सायंकाळी 6 वाजून  55 मिनिटांनी स्फोटाची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशन दलांची वाहनं घटनास्थळी रवाना झाली होती.   

Continues below advertisement


राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,  30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो गेट क्रमांक 1  जवळ पार्किंगमध्ये कारचा स्फोट झाला. या घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी सुरक्षा यंत्रणा दाखल झाली आहे. तर, नवी दिल्ली, मुंबई, लखनौसह विविध शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा स्फोट मेट्रो स्टेशनमधील गेट क्रमांक 1 च्या पार्किंगमध्ये झाला आहे.  त्यानंत र इतर गाड्यांना आग लाली. गेट क्रमांक 1 चा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार त्यांना स्थानिकांनी सांगितल्यानुसार इको व्हॅनमध्ये पहिला स्फोट झाल्याचा त्यांना संशय आहे.  


दिल्लीत ज्या ठिकाणी स्फोट झाला तो परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. घटनास्थळी विशेष पथकं दाखलं झाली आहेत. दहशतवाद विरोधी पथकं, सायबर गुन्ह्यांसदर्भातील पथकं त्या ठिकाणी पोहोचली आहेत. 


दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी म्हटलं की या घटनेचा बारकाईनं तपास केला जात आहे. हा सामान्य स्फोट नाही. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले की स्फोटाची चौकशी होत आहे, हा सामान्य स्फोट नाही. सायंकाळी 6.52 मिनिटांनी एक धिम्या गतीनं एक कार आली आणि रेड लाईटवर थांबली. आणि त्यात स्फोट झाला. स्फोटामुळं आजूबाजूच्या वाहनांचं नुकसान झालं. सर्व यंत्रणा एफएसएल, एनआय घटनास्थळी पोहोचली आहे. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे.तर, काही जण जखमी झाले आहेत. या घटनेवर नजर ठेवून आहोत. गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला फोन केला होता. वेळोवेळी माहिती दिली जात आहे, असं सतीश गोलचा म्हणाले.


फरीदाबादमधून 3000 किलो स्फोटकं जप्त


आज फरीदाबादमध्ये तीन हजार किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. फरीदाबादमध्ये एका काश्मिरी डॉक्रटरच्या भाड्याच्या घरात 360 किलो स्फोटकं आणि शस्त्र जप्त करण्यात आली होती. फरीदाबाद आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती.  ज्यामध्ये 8 जणांना अटक करण्यात आलं होती.