नवी दिल्ली : संपूर्ण दिल्ली काळ्या धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणंही अवघड झालं आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



गुरुग्राममधल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीच्या इतिहासातील हे 17 वर्षातील सर्वात धोकादायक धुरके आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढलीये. दिल्लीत यामुळे प्रदूषण इमरजेंसी लागू करण्यात आली आहे.



दिवाळीनंतर दिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन फटकारलं आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊलं उचलण्याचे आदेश लवादाने दिले आहेत.