नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरात आज कपात झाली आहे. विना अनुदानित एलपीजी सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर अनुदानित सिलेंडर 6.52 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  सामान्य जनतेला या कपातीने दिलासा मिळणार आहे.

कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने ऑईल मार्केटींग कंपन्यांनी ही कपात केल्याची माहिती मिळाली आहे. नवीन दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होतील.

काय असतील सिलेंडरचे भाव?
सध्या दिल्लीमध्ये विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचा भाव 942.50 रुपये इतका आहे. या कपातीनंतर सिलेंडरचा नवीन दर 809.50 रुपये इतका होईल. तसेच विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा भाव 507 रुपयांवरुन 500 रुपये इतका होईल.