जयपूर : राजस्थान हायकोर्टाने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची सरकारला सूचना दिली आहे. हिंगोनिया गोशाळा प्रकरणी राजस्थानच्या हायकोर्टात याचिका दाखल होती. त्यावर सुनावणीवेळी हायकोर्टाने ही सूचना दिली.
विशेष म्हणजे, गोवंश हत्या करणाऱ्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी सूचनाही हायकोर्टाने केली आहे.
https://twitter.com/ani_digital/status/869832624797122560?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fabpnews.abplive.in%2Findia-news%2Fmake-cow-the-national-animal-rajasthan-hc-to-centre-626881
जयपूर जवळच्या हिंगोनिया गोशाळेतील दुरावस्थेवरुन एक याचिका हायकोर्टात दाखल होती. यामध्ये गोशाळेच्या दुरावस्थेचा मुद्दा उठवून तो बंद करण्याची मागणी होत होती. यावर हायकोर्टात सुनावणीवेळी हायकोर्टाने हे आदेश दिले.
केरळमध्ये गोहत्येचं प्रकरण ताजं असतानाच राजस्थान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोहत्या केल्याचा आरोप आहे. यातील 16 काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात तक्रारही दाखल झाली होती. केरळ भाजपचे अध्यक्ष राजशेखरन यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.