नवी दिल्ली : "केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करणं हा हिंदूंवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कारच आहे", असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे.
महिलांना प्रवेशबंदी असलेल्या केरळमधील शबरीमला मंदिरात बुधवारी दोन महिलांनी प्रवेश करत ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनंतकुमार हेगडे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. "केरळमधील शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. तसेच हा दिवसाढवळ्या हिंदूंवर झालेला बलात्कारच आहे", असे ते म्हणाले.
10 ते 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही महिलांच्या मंदिर प्रवेशाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे.
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी मंगळवारी केरळमध्ये मानवी साखळी बनवणाऱ्या महिलांवर भाजप-आरएसएसच्या काही कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या लोकांनी मीडिया प्रतिनिधी आणि पोलिसांवरही दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सनातनी मंडळींनी महिलांच्या सबरीमला मंदिर प्रवेशाला विरोध केला आहे. शिवाय भाजपनेही कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन महिलांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. या मुद्द्यावरुन आज केरळ बंदची हाक देण्यात आली आहे.
'हा हिंदूंवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कारच', केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त विधान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2019 08:39 AM (IST)
महिलांना प्रवेशबंदी असलेल्या केरळमधील शबरीमाला मंदिरात बुधवारी दोन महिलांनी प्रवेश करत ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनंतकुमार हेगडे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -