14 वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो यांचा जन्म 6 जुलै 1935 रोजी ईशान्य तिबेटच्या ताकस्तेर भागात झाला. आज त्यांचा 86 वा वाढदिवस आहे. दलाई लामा 6 दशकांपासून भारतात राहत आहेत आणि स्वत: ला भारताचा मुलगा मानतात. त्याच बरोबर, त्यांचा वाढदिवस हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील तिबेटी समुदायासाठी दरवर्षी सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. यावेळी कोविड 19 मुळे मॅकलॉडगंज धर्मशाळेत त्सुगलगखांग येथे महोत्सवाचे आयोजन केले जाणार नाही. तसेच, केंद्रीय तिबेट प्रशासनाने गाईडलाईन्स काढल्या असून सभा आयोजित करू नका असे सांगितले आहे.
हिमाचल प्रदेश सरकारने सामाजिक मेळाव्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि एसओपी जारी केले आहेत. ज्यात 50 लोकांपर्यंतची मर्यादा घालण्यात आली आहे. यासह, जनतेला गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. खरं तर, तिबेटी लोकांसाठी, दलाई लामा ही चेनरेझिगची मानवी अभिव्यक्ती आहे. दरवर्षी हा दिवस भव्यता, वैभव आणि उत्सवाच्या भावनेने साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिवस त्याच उत्साहाने साजरा केला जाईल. मात्र, कोविडच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटच्या माध्यमातून दलाई लामा यांना वाढदिवशी शुभेच्छा दिल्या असून त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोविडच्या आधी वाढदिवस कसा साजरा केला जायचा?
दलाई लामा यांचा वाढदिवस हा तिबेटी समुदायाच्या भव्य कार्यक्रमांपैकी एक आहे. या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केंद्रीय तिबेट प्रशासन, केंद्रीय सरकाराचे निर्वासित अधिकारी, हिमाचल प्रदेश सरकारचे अधिकारी, भारत सरकारचे प्रतिनिधी आणि विविध नामांकित जागतिक व्यक्ती उपस्थित असत. त्याचवेळी, दरवर्षी दलाई लामा यांच्या वाढदिवशी हिमालय, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशातील लोकं नृत्य, गाणी सादर करायचे.
कोविडमुळे नियमावली
कोविड 19 साथीच्या आजारामुळे हिमाचल प्रदेश सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. म्हणूनच दलाई लामा यांच्या वाढदिवशी त्सुगलगखांग लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. परमपूज्य दलाई लामा यांनी गेल्या फेब्रुवारी 2020 पासून त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मे 2020 पासून ते शास्त्रज्ञ आणि विद्वानांशी साप्ताहिक जाहीर चर्चा करतात. ज्याला 6 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे.