P305 Rescue Operations LIVE : बार्ज P-305 वर 34 जणांचा मृत्यू

भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2021 12:53 PM

पार्श्वभूमी

मुंबई : तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका समुद्रात अडकलेल्या जहाजांना बसला आहे. भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर...More

18 जणांचे मृतदेह घेऊन INS कोलकाता मुंबईच्या बंदरावर परतणार

18 जणांचे मृतदेह घेऊन lNS कोलकाता मुंबईच्या बंदरावर परतणार आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 वरील 184 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर बेपत्ता 77 पैकी 34 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.