Cyclone Michaung Live Updates : मिचॉन्ग चक्रीवादळाचं तांडव! चेन्नई, तामिळनाडूत मुसळधार पाऊस; आंध्रात धडकणार

Cyclone Michaung Latest Updates : चक्रीवादळ मिचॉन्ग (Michaung Cyclone) दुपारच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Dec 2023 01:19 PM
Cyclone Michaung Live Updates : चक्रीवादळामुळे रेल्वे सेवा रद्द

Cyclone Michaung Updates : 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) सोमवारी चेन्नई (Chennai) आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) पडत आहे. चक्रीवादळामुळे रेल्वे सेवा (Railway Services) रद्द करण्यात आल्या आहेत. 'मिचॉन्ग' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्री उशिरापासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

Maharashtra Weather : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस, बळीराजा संकटात

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ मिचॉन्गमुळे (Cyclone Michaung) देशासह राज्यात आजही पाऊस (Rain News) सुरु आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहणार आहे, राज्यातील अनेक भागात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे. 

Cyclone Michaung : चक्रीवादळाचा कहर; अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, पाहा फोटो



पाहा फोटो

Cyclone Michaung Live Updates : मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये पूरस्थिती

Chennai Live Updates : चक्रीवादळाचा चेन्नईला मोठा तडाखा बसला आहे. चेन्नईतील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सांगितलं की, चेन्नईतील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.





Cyclone Michaung LIVE Updates : चेन्नईतील विमानसेवा पुन्हा सुरु

Chennai Airport Resumes : चेन्नई विमानतळावरील हवाई सेवा सुरु करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साचल्याने सोमवारपासून मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. आता विमानसेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Cyclone Michaung Live Updates :

Andhra Pradesh Rain Updates : मिचॉन्ग चक्रीवादळ  (Cyclone Michaung) आज आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर नेल्लोर आणि मछलीपट्टणम, बापटला जवळील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपात पाऊस सुरु आहे.


 





पार्श्वभूमी

Cyclone Michaung Live Updates : देशावर सध्या चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग (Michaung Cyclone) दुपारच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. दक्षिण भारतात चक्रीवादळाचं तांडव सुरु आहे. चेन्नई, तामिळनाडू आंध्र प्रदेशात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. चेन्नईतील मृतांची संख्या 8 वर पोहोचली आहे, तर तामिळनाडूमध्येही दोन जणांच मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ सध्या 90-100 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकरत असून हा वेग 110 किमी प्रतितासच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.