'फनी' या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या 12 तासांत 'फनी' चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनूसार दक्षिणपूर्व बंगाल खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबवाच्या क्षेत्रामुळे 'फनी' हे वादळ निर्माण झालं आहे. हे वादळ 30 एप्रिलला संध्याकाळी तमिळनाडूच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर तसेच आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकू शकते. तसेच हे वादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
या वादळाबाबत भारतीय हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्यूंजय महापात्र यांनी माहिती दिली आहे. 'फनी चक्रीवादळ पुढच्या काही काळात आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर पोहचेल. किनाऱ्यावर धडकण्यापुर्वी हे चक्रीवादळ परत फिरण्याचीही शक्यता आहे. सध्या आम्ही या वादळाच्या हालचीलींवर लक्ष ठेवून आहोत', अशी माहिती महापात्र यांनी दिली आहे.
या वादळामुळे 29 आणि 30 एप्रिलला केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच 30 एप्रिल आणि 1 मे ला उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रच्या काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
'फनी' चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यता, दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2019 02:14 PM (IST)
'फनी' या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या 12 तासांत 'फनी' चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
वरदा चक्रीवादळ चेन्नईला धडकलं आहे. 110/120 प्रती तास वेगाने हे वादळ पुढे सरकत असून, चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -