सोनू गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. एका आईच्या कौर्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने जगासमोर आली.
सोनू गुप्ताचं लग्नानंतर कायम पती आणि सासू सासऱ्यांशी भांडण होत असे. अनेकवेळा घरगुती भांडण पोलिस ठाण्यापर्यंतही गेलं होतं. सोनू गुप्ताची कोणत्या तरी कारणावरुन सासू सासऱ्यांसोबत वाद सुरु होते. हळूहळू भांडण वाढत गेलं. रागाच्या भरात तिने शेजारी असलेले कपडे आणि त्यानंतर तीन वर्षांच्या मुलाला पायऱ्यांवरुन फेकलं.
सुदैवाने तीन वर्षांच्या मुलाला जास्त दुखापत झालेली नाही. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपी आई सोनू गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अद्याप अटक झालेली नाही. सोनू गुप्ताला शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.