दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या तरुणांच्या पालकांनी आपल्या मुलांना समर्पण करण्यास सांगावं. जर त्यांनी समर्पण केलं नाही तर आम्ही त्यांना ठार करु, असा इशारा कंवलजीत ढिल्लो यांनी दिला आहे.
100 तासांच्या आत दहशतवाद्यांचा खात्मा केला : कंवलजीत सिंह ढिल्लो
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सर्वांनी पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 100 तासांच्या आत सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. मात्र पुलवामा हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि काय प्लानिंग होतं, याबाबतची माहिती देण्यास भारतीय सैन्याने नकार दिला.
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यावर दया दाखवणार नाही : कंवलजीत सिंह ढिल्लो
कंवलजीत सिंह ढिल्लो पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील पालकांनी आपल्या मुलांना दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आणावं. जर असं झालं नाही तर आम्ही त्यांना सोडणार नाही. दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम राबवत आहोत. मात्र दहशतवादी कारवायामध्ये सहभागी होणाऱ्यांवर दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही कंवलजीत सिंह ढिल्लो यांनी दिला.
शहीदांच्या कुटुंबीयांनी एकटं समजू नये : कंवलजीत सिंह ढिल्लो
शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला एकटं समजू नये. आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू. देशात विविध ठिकाणी अनेक काश्मिरी मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी आम्ही हेल्पलाईल सुरु केली आहे, अशी माहिती कंवलजीत सिंह ढिल्लो यावेळी दिली.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
व्हिडीओ
सैन्यदल आणि सीआरपीएफची संयुक्त पत्रकार परिषद | UNCUT | नवी दिल्ली
पुलवामा चकमकीतील शहीद मेजर विभूती शंकर यांना अखेरचा निरोप | देहराडून