राजन यांच्यानंतर नोटांवर सह्या कोण करणार ? 7 नावं चर्चेत
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 05:24 AM (IST)
नवी दिल्लीः रघुराम राजन गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सध्या सात नावं चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. रघुराम राजन यांनी शनिवारी आरबीआय कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आपल्याला पुन्हा गव्हर्नरपद स्वीकारण्यात रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते शैक्षणिक कार्याकडे वळणार आहेत. यांची नावं आहेत चर्चेत आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सध्या विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांची चर्चा आहे. उर्जित पटेल सध्या आरबीआयचे उपगव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. तर अरुंधती भट्टाचार्य देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या प्रमुख आहेत.