नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन न्यायपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता या पत्रकार परिषदेनंतर सीपीआय नेते डी. राजा यांनी न्यायमूर्ती चेलमेश्वरांची भेट घेतल्याने, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोर्टाच्या कामकाजात ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचं सांगितलं. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच ही पत्रकार परिषद न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या घराबाहेर घेण्यात आली.

“पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये, म्हणून आम्ही ही परिस्थिती सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.” असंही न्यायमूर्तींनी यावेळी सांगितलं.


पण आता या पत्रकार परिषदेनंतर चर्चा आहे, ती डी. राजा आणि न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या भेटीची. कारण, या पत्रकार परिषदेनंतर सीपीआय नेते डी. राजा न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले. त्यामुळे या भेटीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.



यावरुन जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्लांनी डी. राजांवर निशाणा साधला आहे. उमर अब्दुल्लांनी ट्वीट करुन म्हटलंय की, “माझ्या मनात तुमच्याबद्दल मोठा आदर आहे. पण, न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्या घरी जाण्याची तुमची घाई, तुमचा उतावीळपणा दर्शवते. तुम्ही त्या लोकांच्या हातातील बाहुलं बनत आहात, जे न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरुन जनतेत असंतोष पसरवू पाहात आहेत.”


दुसरीकडे डी. राजा यांनी न्यायमूर्ती चेलमेश्वर यांची घेतलेल्या भेटीचं भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी समर्थन केलं आहे. स्वामींनी म्हटलंय की, “भेट घेतली तर काय झालं? ही इतकी महत्त्वाची गोष्ट नाही. डी.राजा केवळ एक राजकीय नेतेच नाहीत, तर राज्यसभेचे सदस्य देखील आहेत.”

भेटीनंतर डी.राजांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या भेटीनंतर डी.राजा यांनी सांगितलं की, “न्यायमूर्तींनी उचलेलं पाऊल अतिशय मोठं आणि धाडसाचं आहे. शिवाय यातून न्यायपालिका धोक्यात असल्याचं दर्शवते. न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि माझी जुनी ओळख आहे, आणि त्यांचे-माझे व्यक्तीगत संबंध आहेत. ते आपल्या अडचणी माझ्यासमोर मांडत असतात. जर त्यांना अशी कोणतीही चिंता सतावत असेल, तर एक राज्यसभेचा सदस्य या नात्यानं या प्रकरणी विचार करुन, त्यावर तोडगा काढणं माझं मी कर्तव्य समजतो.”

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

देशातील लोकशाही धोक्यात, न्यायमूर्तींच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचं वक्तव्य
या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे