Covid-19 Vaccination : देशात सध्या वाढत असलेल्या दैनंदिन कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल (Dr VK Paul) यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाला (Covid-19) इग्रोन करु नका, तो अद्याप गेलेला नाही, असे ते म्हणाले.  दरम्यान, दिल्ली आणि पंजाबमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहाता राज्या सरकारने मास्क सक्ती केली आहे. दिल्लीमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. 


देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहाता डॉ. व्ही के पॉल म्हणाले की, 'देशातील कोरोना अद्याप संपलेला नाही. देशात सध्या वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरुन कोरोनाचा प्रसार किती होईल हे सांगणं कठीण आहे. पण सावध राहायला हवं. कोरोना नियमांचं पालन सर्वांनीच करणं गरजेचं आहे. '






त्याशिवाय पॉल म्हणाले की, कोरोना लस (Covid Vaccine), कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सीन (Covaxin) याशिवाय आता आपल्याला CorbeVax लसही घेता येईल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे गरजेच आहे. सर्वांनी सावध राहावे... तसेच कोरोना नियमांचं पालन करावे. 


राजधानीमध्ये कोरोनाचा हाहा:कार 
मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 12 दिवसांपासून दिल्लीमध्ये दररोज दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळक आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात येत असलेल्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. तसेच मृताची संख्यामध्येही वाढ दिसत आहे.   


देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण  - 
मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220  रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.