पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात कोविड कर्फ्यू 12 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता 30 जूनपर्यंत राज्यात कोविड-कर्फ्यू लागू करण्यात आला होता. आता राज्य सरकारने एक आठवड्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान सर्व आवश्यक सेवा सुरू राहतील. रेशन व इतर खाद्यपदार्थाची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उघडतील. याशिवाय शॉपिंग मॉल्समधील दुकानेही या काळात खुली राहतील. 


यामध्ये सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स आणि मनोरंजन झोन उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. कर्फ्यू दरम्यान सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होम डिलीव्हरी करण्यास चालू राहणार आहे. तर सलून्स आणि खुली मैदाने/ स्टेडियम उघडी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.




शॉपिंग मॉल्समध्ये दुकाने उघडण्यास परवानगी
राज्यातील कोविड-कर्फ्यू दरम्यान रेशन व इतर खाद्यपदार्थांची दुकाने पूर्वीप्रमाणे सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उघडतील. याशिवाय शॉपिंग मॉल्सच्या आत दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. ही दुकानेसुद्धा सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील. यावेळी, बार, जलतरण तलाव आणि जिम उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही.