Corona Vaccination Update |  कोरोनाची धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिम देशभर सुरू आहे. मात्र यात बातमी अशी आहे की खासगी रुग्णालये लसीकरण मोहिमेबाबत जास्त उत्साह दाखवत  नाहीयेत. अधिकृत आकडेवारीनुसार, खासगी रुग्णालये कोरोना लस डोससाठी दररोजच्या सत्रापैकी केवळ 10-15 टक्केच शेड्युल करत आहेत. तर केंद्र सरकारने त्यांना राउंड द क्लॉक सेशनसाठी परवानगी दिली आहे.


शनिवारी लसीकरण करणार्‍या 40,000 हून अधिक जागांपैकी केवळ 5507 खासगी रुग्णालयात आहेत. तर सरकारी रुग्णालयांमध्ये 34,510 सत्रे घेण्यात आली होती. त्यामुळे खासगी रुग्णालयांत लसीकरणाची गती कमी असल्याचं दिसून आलं आहे. अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सरकार या विषयावर विचार करत आहे आणि राज्यांना खाजगी रुग्णालयांकडे जिल्हा पातळीवर हा मुद्दा मांडावा आणि खासगी रुग्णालयांच्या समस्येबद्दल जाणून घेण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, को-विन अॅपवर बरीच रुग्णालये आहेत, ज्यांनी काही सत्रांचे वेळापत्रक ठेवले आहे आणि नंतर ते बंद केले आहेत. हे का घडत आहे हे आम्हाला माहित असणे आवश्यक आहे.


Corona Vaccination | देशात चार कोटी लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाने घेतला वेग


70 टक्क्यांहून अधिक लोकांचा सरकारी रुग्णालयात लसीकरण


देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली, तेव्हापासून 7.26 लाखाहून अधिक लसीकरण सत्रे घेण्यात आली आहेत. शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 4.36 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या या मोहिमेमध्ये सरकारी व खासगी क्षेत्रातील सुमारे 50000 रुग्णालयांची नावनोंदणी झाली आहे. सरकारी रुग्णालयांमधील 85 टक्क्यांहून अधिक सत्रे घेण्यात आली असून सुमारे 70 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा कमी लस  देण्यात आली आहे. 


झोरम, नागालँड, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होतोय.


 


संबंधित बातम्या :