नवी दिल्ली : भारताला वर्षाच्या अखेरीस 267 कोटी लसींचे डोस उपल्बध होणार आहेत. वर्षाअखेरीस देश अशा स्थितीत असेल की किमान देशातील 18 वर्षांवरील लोकांचं सर्वाचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. जुलैपर्यंत कोरोना लसीचे 51 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत, तर 216 कोटी अन्य डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होतील.


छोट्या राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ


पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील आठ राज्यांच्या आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिवांशी बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, की ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भारताला 216 कोटी डोस मिळणार आहे. तर जुलैपर्यंत कोरोना लसीचे 51 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. वर्षाच्या अखेरीस किमान देशातीस 18 वर्षांवरील लोकांचं सर्वाचं लसीकरण पूर्ण होईल.


या चर्चेदरम्यान आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी असेही म्हटलं आहे की, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील आठ राज्यांत कोरोनाच्या दैनंदिन आकडेवाडीत वाढ झाली असून, मृत्यूच्या आकड्यातही झपाट्याने वाढ होतं आहे. छोट्या राज्यांत कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असून याबाबत जागरुक राहण्याची गरज असल्याचं मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. यादरम्यान, त्यांनी कोराना महामारीला रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचाही उल्लेख केला.


घरबसल्या कोरोना चाचणी करता येणार, ICMR कडून होम बेस्ड कोविड टेस्टिंग किटला मंजुरी


देशात कोरोना चाचणीत वाढ


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना चाचणी केंद्रे सक्षम करण्यावर भर दिला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, आम्ही कोरोना चाचणी वाढवल्या असून आता दररोज 25 लाख लोकांच्या कोरोना चाचणी केल्या जातात. मंगळवारी एका दिवसात प्रथमच भारताने 20 लाखाहून अधिक लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. तसेच हा एक जागतिक विक्रम आहे देखील असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.


पंतप्रधान मोदी आज 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जीही सहभागी होणार


नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहा राज्यांमधी 54 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कान्फरन्सिंद्वारे ही बैठक होईल. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार यावर चर्चा करणार आहे. या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत.