नवी दिल्ली : भारताने करोनावरील लसीकरण मोहीमेत नवा रेकॉर्ड बनवला आहे. 15 ते 18 वयोगटातीवल लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 3 जानेवारीपासून   15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंच तीन कोटीपेक्षा अधिक युवकांनी ही लस घेतली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी आनंद व्यक्त आहे.


मनसुख मंडाविया  कू करत  म्हणाले,  देशात प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. 15 ते 18 वयोगटातील तीन कोटीपेक्षा अधिक तरूणांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. मी इतर आणि लसीकरणासाठी पात्र तरुणांना लवकरात लवकर पहिला डोस घेण्याचे आवाहन करत आहे. 


 







 


देशाक बुधवारी 66 लाखापेक्षा अधिक कोरोनाच्या लस देण्यात आल्या आहे. आतापर्यंत देशात 154.5 कोटी लोकांना अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशाच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान 26,19,670 आरोग्य कर्माचारी आणि 60 वर्षावरील अधिक नागरीकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे.


गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 


गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 13.11 आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.   कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून, ओमायक्रनचा धोका देखील वाढत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 488 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण हे 11 लाख 17 हजार 531 आहेत. तर गेल्या 24 तासात 84 हजार 825 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.  आत्तापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: