Covid-19 Symptoms Study : कोरोना महामारीच्या लक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळत आहे. ताज्या अभ्यासानुसार, आता ताप (Fever) कोरोनाचं लक्षण नाही तर घसा खवखवणे (Sore Throat) हे कोरोनाचं प्रमुख लक्षण झालेय. 17 हजार 500 लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात घशामध्ये होणारी खवखव हे कोरोनाचं सुरुवातीच्या काळातील लक्षणं असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. जॉय कोरोना अभ्यासानुसार, घशात खवखवण्यानंतर डोके दुखणं (Headache) आणि नाक बंद होणे (Blocked Nose) ही लक्षणं कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाली.
कोरोना महामारीच्या सुरुवातील ताप येणे अथवा वास न येणे ही कोरोनाची लक्षणं असल्याचं समोर आले होते. त्यानंतर कालांतराने कोरोनाच्या पहिल्या लक्षणांमध्ये बदल होत गेला. ताप येणे अथवा वास न येणे आणि चव नसणे आता कोरोनाबाधितांमध्ये जास्त प्रमाणात दिसत नाही. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ही लक्षणे कमी प्रमाणात दिसत आहेत. नव्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे पडताळण्यासाठी घसा खवखवणे हे प्रमुख लक्षण झालेय. खोकला, कर्कश आवाज, शिंका आणि थकवा ही सामान्य लक्षणं असल्याचं समोर आलेय.
कोरोना रुप बदलतोय -
जॉय हेल्थ स्टडीचे सह-संस्थापक आणि प्रमुख वैज्ञानिक टिम स्पेक्टर म्हणाले की, 'कोरोना विषाणू लोकांमध्ये अद्याप तसाच आहे. सध्या तुम्हाला जर सर्दी सारखं लक्षणं असेल तर कोविडचं लक्षणं असू शकतं. कोरोना अनेक व्हेरियंट आणि सब व्हेरियंटमध्ये आहे. उदा. ओमायक्रॉनमध्ये अनेक सब व्हेरियंट झाले आहेत. यामध्ये BA.2, BA.4 आणि BA.5 इतरांचा समावेश आहे. ' जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. डेविड नाबरो म्हणाले की, कोरोना सातत्याने विकसित होत आहे. तो वारंवार आपले रुप बदलत आहे.
कोरोनाची प्रमुख लक्षणं -
गेल्य आठवड्यात 17 हजार 500 लोकांचं परीक्षण करण्यात आले. यामध्ये पाच प्रमुख लक्षणं जाणवली. यामध्ये घशात खवखवणे, डोके दुखणं, नाक बंद होणे, कफ, सर्दी या प्रमुख लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय इतर लक्षणेही आढळली आहेत.