Covid-19 Cases LIVE : कोरोनामुळे चिंता वाढली! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Coronavirus LIVE Updates : जगात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. भारतातही प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून खबरदारी घेतली जात आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Dec 2022 01:22 PM

पार्श्वभूमी

Coronavirus Updates in India : जगभरात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि त्याचे सब व्हेरियंट BF.7 आणि BF.12 यांचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे....More

Rules for International Travellers  : चीन, जपानसह 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR अनिवार्य

India COVID-19 Travel Rules : परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाईल. तसेच चीन, जपान, कोरियामधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. मांडविया यांनी सांगितलं की, 'चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.'