Rise In Covid Cases : भारतात पुन्हा एकदा कोरोना (Corona In India) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण दहा दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ंणांची संख्या वाढू लागली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही वाढत आहे.  शुक्रवारी (10 जून) दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.26% टक्केंवर पोहचलाय.  31 मार्च रोजी 0.64% टक्के होता. शुक्रवारी (10 जून) भारतात 7,584 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर  24 रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर 3,791 जणांनी कोरोनावर मात केली होती.  देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 32 लाख 5 हजार 106 झाली आहे.

देशात आतापर्यंत चार कोटी  26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पाच लाख 24 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी देशात दैनंदिन 2,338 नवे रुग्ण आढळले होते. तर सक्रिय रुग्णांची संख्या 17,883 इतकी होती.. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.64% इतकी होती.  आता दहा जून रोजी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 7,584 इथकी झाली आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.26% इतका झालाय. देशात झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दहा दिवसांत तब्बल तीनपट रुग्णांची संख्या वाढली आहे. 

मागील दहा दिवसांतील दैनंदिन कोरोना रुग्णांची वाढेली संख्या 

1 जून, बुधवार 2,745
2 जून, गुरुवार 3,712
3 जून 4,041
4 जून 3,96
5 जून 4,270
6 जून 4,518
7 जून 3,714
8 जून 5,233
9 जून 7,240
10 जून शुक्रवार 7584

 
 महाराष्ट्र, दिल्ली, केरळ आणि कर्नाटक या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारने पत्र लिहून कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी सूचना केल्या आहेत. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची चिंता वाढली आहे.