लैंगिक अत्याचार करुन चिमुरडीची हत्या, चुलत भावाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 08 Apr 2016 05:51 AM (IST)
नवी दिल्ली: दिल्लीमधील उत्तम नगर येथील एका आठ वर्षीय चिमुरडीवर चुलत भावानेच लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चिमुरडीचा मृतदेह तिच्याच घराजवळ आढळून आला. मंगळवारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. अपहरणाची तक्रारही नोंदविण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा शोधही सुरु होता. मुलीच्या घरापासून काहीशी अंतरावर असलेल्या एका नाल्यामध्ये मुलीचं शव आढळून आलं. त्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरवण्यात आली. त्यानंतर पोलिसांना तिच्या चुलत भावावर संशय आला. हा चुलत भाऊ उत्तम नगरमधील झोपडपट्टीमध्येच राहतो. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, ज्या दिवशी मुलगी हरवली तेव्हा त्यानं मुलीला या भावासोबतच पाहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिच्या भावाला अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.