चंदीगड : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराप्रकरणी बाबा राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र ही शिक्षा सुनावल्यानंतरही राम रहीमने तुरुंगात व्हीव्हीआयपी ट्रिटमेंटची मागणी केली. ज्यामुळे कोर्टाने राम रहीमला फटकारलं.


तुरुंगात चहा मागितला तर दिला नाही. तिथलं जेवणही चांगलं नाही, त्यामुळे व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात यावी, अशी मागणी राम रहीमने त्याच्या वकिलामार्फत केली. मात्र कोर्टाने बाबा राम रहीमला झापत तुम्हाला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येईल, असं स्पष्ट केलं.

राम रहीमला 65 हजार रुपये दंड

कोर्टाने दहा वर्षांच्या शिक्षेशिवाय राम रहीमला 65 हजार रुपये आर्थिक दंडही ठोठावला आहे. विविध तीन कलमांनुसार अनुक्रमे 50 हजार, 10 हजार आणि 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट प्रकरणी कोर्टाने सरकारलाही झापलं

राम रहीमसोबत असलेल्या सुटकेसवरु कोर्टाने तीव्र शब्दात सरकारवर ताशेरे ओढले. राम रहीमसोबत जी तरुणी आली, ती कोण होती? असा सवाल कोर्टाने केला. शिवाय सरकारने व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट दिल्यामुळे कोर्टाने सरकारलाही फैलावर घेतलं.

राम रहीमकडे कोणते पर्याय?

राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं.

राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.

संबंधित बातम्या :

बाबा राम रहीमचा फैसला आज, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी


हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?


न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!


राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं


गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?


व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला


बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली


बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू


भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन


अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?


कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात


राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट


बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी