महाराष्ट्रातील प्रेमी युगुलाची आग्र्यात आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 09:01 AM (IST)
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या प्रेमी युगुलाने आग्र्यात आत्महत्या केली. प्रेमाचं प्रतीक मानलं जाणारा ताजमहल पाहून या युगुलाने आग्र्यात त्यांचं जीवन संपवलं. अयोध्या दिनकर आणि झाकीर हुसैन अशी या दोघांची नावं आहेत. घरातून प्रेमसंबंधांना विरोध असल्याने या दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोघे ताजमहल पाहायला गेले होते. तिथे फोटो काढून दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरुन ते महाराष्ट्रातील असल्याचं समजलं. त्यानंतर दोघांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली.