नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. मात्र आतापर्यंत या व्हायरसवर कोणतंही व्हॅक्सिन बनवण्यात आलेलं नाही. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरससाठीच्या व्हॅक्सिनचं परीक्षण पुढील आठवड्यात केलं जाणार आहे. तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीवर हे परीक्षण केलं जाणार आहे. या व्हॅक्सिनमुळे काही साईड इफेक्ट होतायेत का, याचं परीक्षण केलं जाणार आहे.


अमेरिकेतील राष्ट्रीय स्वास्थ्य संस्था याचं परीक्षण करणार आहे. वॉशिग्टनमधील हेल्थ रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये हे परीक्षण केलं जाणार आहे. परीक्षण यशस्वी झाल्यास व्हॅक्सिन तयार करण्यास एक वर्षाचा कालावधी लागेल असेल तज्ज्ञांचं मत आहे. जगभरातील अनेक औषध बनवणाऱ्या कंपन्या देखील कोरोनावरील औषधाची आणि व्हॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी संशोधन करत आहेत.


जगभरातील 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतार्यंत 6515 नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा सर्वाधिक आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 3214 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्ये कोरोनामुळे 1809 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 24 हजार 747 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.



संबंधित बातम्या