Coronavirus in India Updates :  देशात कोरोनाची महासाथ आटोक्यात येत असल्याचे वाटत असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात मागील 24 तासात 8895 कोरोनाबाधित आढळले. तर, 2796 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाचे तीन कोटी 46 लाख 33 हजार 255 प्रकरणे आढळली आहेत. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाचे 99 हजार 155 सक्रिय बाधित आहेत. या महासाथीमध्ये प्राण गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 73 हजार 326 इतकी झाली आहे. तर, मागील 24 तासात 6918 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली. आतापर्यंत तीन कोटी 46 लाख 60 हजार 774 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 


 







लशीचे 127 कोटी डोस


देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेतंर्गत आतापर्यंत 127 कोटी कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी एक कोटी 41 लाख 8 हजार 707 डोस देण्यात आले आहेत. 


दरम्यान, देशात आतापर्यंत 127 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले असताना हिमाचल प्रदेशच्या नावे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरलं आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे. राज्यातील एकूण 53,86,393 प्रौढ नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशने त्या राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. आता एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.