नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी येताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात एक लाख 73 हजार नव्या रुग्णांची बर पडली असून ही आकडेवारी गेल्या 45 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे. तसेच गेल्या 24 तासात दोन लाख 84 हजार 601 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 3617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी देशात 1.86 लाख कोरोना रुग्णांची भर पडली होती तर 3660 रुग्णांनी आपला जीव गमावला होता.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 77 लाख 29 हजार 247
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 51 लाख 78 हजार 011
- एकूण सक्रिय रुग्ण : 22 लाख 28 हजार 724
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 3 लाख 22 हजार 512
केंद्रीय मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 89 लाख 02 हजार 445 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्यानं शिथिलता आणली तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 20 दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय.
राज्यात आजपर्यंत एकूण 53,07,874 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.24 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,43,50,186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,92,920 (16.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,54,976 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या :