नवी दिल्ली : देशातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आता भारतीय हवाई दलाने कंबर कसली आहे. शनिवारी IAF च्या C-17 विमानाने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे मोकळे टँकर आणि कन्टेनर घेऊन सिंगापूरकडे उड्डाण केलं होतं. त्या ठिकाणी ऑक्सिजन भरून हवाई दलाचे हे विमान संध्याकाळी 4.30 वाजता पश्चिम बंगालच्या पानागढ एयरबेसवर पोहोचलं आहे. आता त्या टॅन्करमधील ऑक्सिजन देशभरात वितरीत केलं जात आहे. 


 






देशातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी गेल्या दोन दिवसात जवळपास 50 जणांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत आता देशातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हवाई दलाने कंबर कसली असून IAF च्या विमानांनी देशभर ऑक्सिजनची वाहतूक सुरू केलीय.


देशात रोज तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातच अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आता हवाई दलाने पुढाकार घेतला असून देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनची पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 


नौदलाचाही पुढाकार
भारतीय हवाई दलाच्या बरोबरच आता नौदलही कोरोना विरोधातल्या लढ्यात उतरलं असून शुक्रवारी नौदलाच्या दक्षिण कमांडच्या आएनएस शारदाने ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून कोरोना साहित्याचं जहाज कोच्चीहून लक्षद्विप आणि मिनीकॉय या बेटांवर पोहचवलं. 


महत्वाच्या बातम्या :