Corornavirus Cases Today in India : देशात कोरोना संसर्गातील वाढ कायम आहे. देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला. याच्या तुलनेत शनिवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची संख्या किंचित कमी झाली असली, तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण वाढलं आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 933
सध्या भारतात 1 लाख 34 हजार 933 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 18 हजार 558 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 84 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 5.02 टक्के आहे.
महाराष्ट्रात शनिवारी 1931 कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 1931 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत एकूण 1953 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात बीए. 5 व्हेरीयंटचे 14 रुग्ण तर बीए. 2.75 चे 35 रुग्ण आढळले आहे. यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 272 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 234 वर गेली आहे.
केंद्राचं राज्याचा आरोग्य सचिवांना पत्र
महाराष्ट्रात आणि देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रात आठवड्याला टेस्टचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात घटले, सोबतच कोणत्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे आणि 10 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट कोणत्या जिल्ह्यात आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहित माहिती दिली आहे. पुढील काळात येणाऱ्या सणांमध्ये गर्दीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.