नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक लाख 45 हजार 380 पार पोहोचला आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 6535 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, लागोपाठ चार दिवस सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं आढळून आलं. तसेच मागील 24 तासांमध्ये 146 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4167 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हजार 491 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
दररोज साधारणपणे 6200 नवे रुग्ण
देशात 20 ते 25 मे दरम्यान, दररोज सरासरी 6200 रुग्ण समोर येत आहेत. जर कोरोना बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर 26 मे ते 1 जुलै दरम्यान, 36 दिवसांत जवळपास 2 लाख 23 हजार 200 नवे कोरोना बाधित रुग्ण समोर येऊ शकतात. जर 25 मेपर्यंतच्या कोरोना बाधितांच्या संख्येशी जर ही संख्या जोडली तर, 1 जुलैपर्यंत एकूण कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 62 हजार 45 वर पोहोचू शकते.
पाहा व्हिडीओ : कोरोनाच्या 100 बातम्या, देशभरातील कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचे शंभर अपडेट्स
देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात काल 1 हजार 186 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 हजार 667 झाला आहे. त्यातील 15 हजार 786 बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 35 हजार 178 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मृतांचा आकडा 1695 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.97 टक्के आहे. मुंबईत 31 हजार 972 कोरोनाबाधित असून 026 बळी गेले आहेत.
केरळमध्ये 896 रुग्ण असून त्यातील 532 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 59.37 टक्के एवढा आहे. गेल्या दहापंधरा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय, त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 59 टक्क्यांवर आला आहे.
महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य
तामिळनाडू 17,082 रुग्ण, 8,731 बरे झाले, मृतांचा आकडा 118, रिकव्हरी रेट 51.11 टक्के
गुजरात 14,460 रुग्ण, 6,636 बरे झाले, मृतांचा आकडा 888, रिकव्हरी रेट 45.89 टक्के
दिल्ली 14,053 रुग्ण, 6,771 बरे झाले, मृतांचा आकडा 276, रिकव्हरी रेट 48.18 टक्के
राजस्थान 7,300 रुग्ण, 3,951 बरे झाले, मृतांचा आकडा 167, रिकव्हरी रेट 54.12 टक्के
मध्यप्रदेश 6,859 रुग्ण, 3,571 बरे झाले, मृतांचा आकडा 300, रिकव्हरी रेट 52.06 टक्के
उत्तरप्रदेश 6,532 रुग्ण, 3,581 बरे झाले, मृतांचा आकडा 165, रिकव्हरी रेट 54.82 टक्के
पश्चिम बंगाल 3,815 रुग्ण, 1,441बरे झाले , मृतांचा आकडा 278, रिकव्हरी रेट 37.05 टक्के
मागील 24 तासांत जगभरात 90 हजार नवे कोरोनाग्रस्त
दरम्यान, जगभरातील 213 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 90,128 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत 3,096 ने वाढ झाली आहे. तर एक दिवस अगोदर 2,826 लोकांचा मृत्यू झाला होता. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 55 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 3 लाख 47 हजार 613 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 लाख 61 हजार 092 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 74 टक्के कोरोना बाधित फक्त 12 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 41 लाखांवर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रापेक्षा गुजरातला 303 अधिक ट्रेन; गुजरातमधील मजुरांची संख्या जास्त?
देशात 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार : डॉ. हर्षवर्धन