Coronavirus In India : भारतात (India) गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाच्या (Coronavirus) 291 नवीन रुग्णांची नोंद समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,72,638 झाली आहे, गुरूवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5,30,622 वर पोहचली आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत देश ऐंशीव्या क्रमांकावर आहे.


 


 






आज बरे झालेल्या 377 रुग्णांची नोंद
30 नोव्हेंबर रोजी एकूण 66,194 लोकांचे कोविड-19 लसीकरण करण्यात आले असून, भारतात लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या 2,199,276,276 वर पोहोचली आहे. दरम्यान, भारतात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 44,137,249 असून 1 डिसेंबर 2022 रोजी बरे झालेल्या 377 रुग्णांची नोंद झाली आहे.



  • गेल्या 7 दिवसात भारतात 2,155 कोरोना रुग्णांची नोंद आहे.

  • भारताने आतापर्यंत 2,199,276,276 लसीचे डोस दिले आहेत.

  • 30 नोव्हेंबरच्या तुलनेत 1 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 88 ने कमी झाली.

  • भारतात कोरोना पासून बरे झालेल्यांचा दर 98.80% आहे, तर मृत्यू दर 1.19% आहे.


2020 मध्ये देशात एक कोटींचा आकडा पार


19 डिसेंबर 2020 रोजी या कोरोना रुग्णसंख्येने देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. तर 4 मे 2021 रोजी कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती. 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी कोरोना संसर्गाची एकूण रुग्णसंख्या चार कोटींच्या पुढे गेली होती.


पाच सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्ये
महाराष्ट्र - 8135800
केरळ - 6826290 
कर्नाटक -4071268 
तामिळनाडू -3594144 
आंध्र प्रदेश - 2339054


सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेली पाच राज्ये
केरळ - 1653 
कर्नाटक -1619
महाराष्ट्र -395
गुजरात -199
तामिळनाडू -199 


या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू
महाराष्ट्र -148407 
केरळ -71497
कर्नाटक -40303 
तामिळनाडू -38049 
दिल्ली -26518  


इतर महत्वाच्या बातम्या


Zombie Virus: कोरोनानंतर आणखी एका महामारीची भीती! रशियाच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा जिवंत केला 48,500 वर्षे जुना 'झोम्बी व्हायरस'