Coronavirus updates :  देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 7 हजार 774 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 306 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 33 बाधित आढळून आले आहेत. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 281 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 434 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 8464 बरे झाले होते. आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 22 हजार 795 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. 


देशात सध्या कोरोना विषाणूची सक्रिय प्रकरणे 92,281 आहेत. मागील 560 दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. त्याच वेळी, रिकव्हरी रेट सध्या 98.36% आहे.


आतापर्यंत 132 कोटींहून अधिक डोस दिले गेले


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 132 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी 89 लाख 56 हजार 784 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 132 कोटी 93 लाख 84 हजार 230 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. 





मुंबईत  शनिवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद


 कोरोनाबाधितांच्या  (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.  महाराष्ट्रात शनिवारी 807 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 869  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91  हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.  शनिवारी, 24 तासात मुंबईत 256 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाही रुग्णाला आपला जीव गमवावा लागला नाही. गेल्या 24 तासात 221 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 1808 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,44, 370 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2592 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.