Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय. देशात गेल्या 24 तासांत 3,377 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 2,496 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 801 झाली आहे. काल 3,303 नवीन रुग्णांची नोंद झाली. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 801
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 801 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 2,496 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 753 इतकी झाली आहे. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत 188 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 22 लाख 80 हजार 743 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 188 कोटी 65 लाख 46 हजार 894 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Diesel Price : दिलासा की, कात्री? पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?
- प्रवाशांनो लक्ष द्या... रेल्वेचा मोठा निर्णय! वीज निर्मितीसाठी कोळसा वाहतुकीच्या सुलभतेसाठी काही प्रवासी गाड्या रद्द
- Ratan Tata : रतन टाटा कमालीचे भावूक; आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दल सांगताना म्हणाले...