Coronavirus Cases Today in India : भारतातील कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2706 कोरोना रुग्णांची नोंद आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत ही माहिती दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी दिवसभरात 2 हजार134 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 15 हजार 574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 630 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्या आधीच्या दिवशी म्हणजेच रविवारी 25 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 0.64 टक्क्यांवर पोहोचला आहे.


सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ 
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची 17 हजार 883 इतकी झाली आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत 185 ने वाढ झाली आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात 13 लाख 33 हजार 64 कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या. आतापर्यंत देशात 193 कोटी 45 लाख 19 हजार 805 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्रात सोमवारी 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


सोमवारी महाराष्ट्रात 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण 297 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77 लाख 35 हजार 385 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झालं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या