Coronavirus Cases Today in India : भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव आज किंचित घटला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांची संख्या किंचित कमी झाली आहे. आज देशात 253 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात तीन रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात 275 रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने आज 22 रुग्णांची घट झाली आहे.
आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू
भारतात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून चार कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाख 73 हजार 166 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 627 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4,597 एवढी आहे.
कोरोना संसर्गात किंचित घट
देशात आज कोरोना संसर्गात किचिंत घट झाली आहे. देशात शुक्रवारी 275 कोरोना रुग्ण आढळले होते, तर आज गुरुवारी 253 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर आत तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. या लसीकरणामुळे कोरोनाचा वेग कमी करण्यात प्रशासनाला मदत झाली आहे. मात्र धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही.
जगासह देशात कोरोनाचा संसर्ग कायम असून त्यासोबतच भारतात इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढताना दिसत आहे. देशात व्हायरल फ्लू, सर्दी, खोकला यांसह गोवरचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
चीननं चिंता वाढनवी, एका दिवसात 33,073 नवे कोरोनाबाधित
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 33,073 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 29,085 रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून झिरो कोविड निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर आरोग्य यंत्रणांकडून कोविड चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे. चीनमध्ये सहा महिन्यांनंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे